नागपूरवरून दबाव आल्यानेच सहगल यांचे आमंत्रण रद्द'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

पुणे : ''नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करणे हे बोटचेपी धोरण आहे. मुख्य कारण दडवण्यासाठी मनसेच्या नावाचा वापर केला जात आहे. नागपूरवरून सूचना आणि दबाव आलेला आहे हे उघड आहे.'' असे अशी टिका ऍड. असीम सरोदे यांनी सरकारवर केली.

''सहगल यांच्या लेखी भाषणात प्रामुख्याने धर्मांधता, नक्षलवादावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. हे सर्व मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचे ठरेल. आपली बदनामी होऊ नये म्हणून नयनतारा यांना येऊ देऊ नये हा उद्देश आहे. यात आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि त्यांना सन्मानाने बोलवावे.'' अशी मागणी असीम सरोदे यांनी केली.

प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच रद्द केले आहे. यामुळे आयोजकांची नामुष्की झाली असून, घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही व्यक्त होत आहेत. या पार्श्वभुमीवर काही साहित्यकांनी यांचा विरोध केला.  असीम सरोदे यांनी देखील यावर टिका करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.

Web Title: cancellation of Sehgal's invitation due to Pressure from Nagpur