
गर्भाशय मुखाच्या कर्करोग होणाऱ्या ‘एचपीव्ही’ (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) विषाणूंचे निदान अवघ्या ४० मिनिटांमध्ये करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. यापूर्वी याच कर्करोग निदानाच्या अहवालासाठी रुग्णाला आठ ते दहा दिवस वाट पहावी लागत असे.
पुणे - गर्भाशय मुखाच्या कर्करोग होणाऱ्या ‘एचपीव्ही’ (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) विषाणूंचे निदान अवघ्या ४० मिनिटांमध्ये करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. यापूर्वी याच कर्करोग निदानाच्या अहवालासाठी रुग्णाला आठ ते दहा दिवस वाट पहावी लागत असे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महिलांमधील कर्करोगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोग नियंत्रणाचे आव्हान आहे. ‘एचपीव्ही’ या विषाणूंमुळे हा कर्करोग होतो. या विषाणूंचे निदान केल्यास या प्रकारच्या कर्करोगाला प्रतिबंध करू शकतो. पण, त्यासाठी योग्यवेळी अचूक निदान आणि प्रभावी उपचाराची गरज असते.
'अशा निवडणुका जिंकता येत नाहीत'; फडणवीसांचा अजित पवारांना टोला
पूर्वी असं होत होतं निदान
कर्करोग निदानासाठी घेतलेला नमुना अद्ययावत प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवला जात होता. तेथे आठ ते दहा दिवसांमध्ये याचे निदान होत असे.
आता असं होतं निदान
गर्भाशय मुखाच्या कर्करोग निदानासाठी रुग्णाला किंवा रुग्णाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याची गरज आता इतिहासजमा झाली आहे. लवकर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी संपूर्ण प्रयोगशाळाच रुग्णापर्यंत पोचते. रुग्णाच्या दारात जाऊन त्याचा नमुना घेतला जातो. अवघ्या ४० मिनिटांमध्ये त्याचे निदान होते. हा अहवाल बघून रुग्णावर कोणत्या प्रकारच्या उपचारांची गरज आहे, याचा निर्णय डॉक्टर त्याच क्षणी घेतात. या उपचारात रुग्णाला कोणत्याही वेदना होत नाहीत. अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये उपचाराची प्रक्रिया पूर्ण होते.
'कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दबणारे नाही'; फडणवीसांचे महाविकास आघाडीला आव्हान
पुणेकरांनी दिलेला पर्याय
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि निदान चाचणी किट हे अत्यंत महागडे असते. त्यावरील पर्याय पुणेकरांनी शोधला. रोगनिदानासाठी वापरले जाणारे छोटे उपकरण विकसित केले. त्यातून नमुना घेण्याची पद्धत इतकी सोपी केली की, कोणत्याही प्रशिक्षित आरोग्य सेविकेलाही नमुना घेता येईल. तसेच, प्रत्यक्ष रुग्ण स्वतःही नमुना घेऊ शकतो. या उपकरणातून अवघ्या ४० मिनिटांमध्ये अहवाल मिळतो.
पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सला संशोधनासाठी ‘युनायटेड स्टेट्स- इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी एन्डाओमेंट फंड’तर्फे (युएसआयएसटीईएफ) गर्भाशय मुखाच्या कर्करोग निदानासंबंधीच्या संशोधनासाठी २.५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. या अंतर्गत गर्भाशय मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूची चाचणी व निदान यावर संशोधन करण्यात येणार आहे.
- डॉ. निखिल फडके, संस्थापक, जीनपॅथ डायग्नोस्टिक्स
Edited By - Prashant Patil