राज्यातील पोलीस भरती जाहीर; भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार याबाबत उमेदवार संभ्रमात

मनोज कुंभार
Monday, 21 September 2020

पोलीस भरती जाहीर झाल्याने भरतीसाठी इच्छुक तरुण-तरुणांनी सरावाला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पोलीस भरती  प्रक्रियेतील लेखी आणि शारीरिक परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे ही पोलिस भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भरती प्रक्रियेत शारीरिक आणि लेखी परीक्षा समान गुणांची करण्यात यावी, अशी मागणी पोलिस भरतीसाठी इच्छूक उमेदवार आणि प्रशिक्षक करत आहेत.

वेल्हे, (पुणे) - पोलीस भरती जाहीर झाल्याने भरतीसाठी इच्छुक तरुण-तरुणांनी सरावाला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी आणि शारीरिक परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे ही पोलिस भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भरती प्रक्रियेत शारीरिक आणि लेखी परीक्षा समान गुणांची करण्यात यावी, अशी मागणी पोलिस भरतीसाठी इच्छूक उमेदवार आणि प्रशिक्षक करत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नुकतीच पोलिस भरतीसाठी जागा निघाल्या आहेत. त्यामुळे या पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यादृष्टीने अनेक जणांनी पोलीस भरतीसाठी सरावही सुरू केला आहे. त्यात लेखी आणि शारीरिक अशा दोन्ही परीक्षांचा सराव सुरू केला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पोलीस भरती प्रक्रियेमधील शारीरिक आणि लेखी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. पूर्वी लेखी आणि शारीरिक परीक्षा समान गुणांसाठी होती. तर त्यात बदल करून शारिरीक परीक्षेचे गुण कमी करून लेखी परीक्षेचे गुण वाढविण्यात आले होते. मागील काही पोलीस भरती या पद्धतीनेच झाली आहे. मात्र सध्याची पोलीस भरती प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडणार याबाबत इच्छूक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

पुण्यात कोरोनाचा थरार कायम; रुग्णसंख्येने ओलांडला अडीच लाखांचा आकडा

 

आघाडी सरकारच्या काळात दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यात सर्वात मोठी सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्या प्रक्रियेमध्ये शारीरिक आणि लेखी दोन्ही परीक्षांसाठी समान गुण देण्यात आले होते. त्यामुळे ही पोलीस भरती प्रक्रियाही पूर्वी प्रमाणे सरळ पद्धतीने म्हणजे लेखी आणि शारिरीक परीक्षा समान गुणांची करून राबविण्यात यावी, अशी मागणी इच्छूक तरुण-तरुणी, प्रशिक्षक आणि अकाडमी चालक करत आहेत. 

कोरोनाकाळात द्या आहाराकडे लक्ष!; जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

शारीरिक चाचणी व लेखी या दोन्हींना समान न्याय देण्यात यावा. ग्रामीण भागातील विद्यार्थी लेखी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे भरती प्रक्रिये पासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस भरतीत शारीरिक परीक्षेला प्राधान्यक्रम देण्यात यावा.
- संतोष दसवडकर संस्थापक अध्यक्ष राज तोरण कुस्ती संकुल विंझर(ता. वेल्हे)

रुग्णवाहिकांत ऑक्‍सिजन सुविधा; कोरोना रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार

पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी व लेखी चाचणी प्रक्रिया कशी असेल याबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती नाही. त्यामुळे सराव कशा पद्धतीने करावा, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. पूर्वीप्रमाणे लेखी आणि शारीरिक परीक्षा समान गुणांची व्हावी.
- जी. डी. बागनवर, प्रशिक्षक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates confused about exact process of police recruitment maharashtra state