कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या १६ जागांसाठी आज पासुन उमेदवारी आर्जस सुरूवात

यासाठी प्रत्येक तालुक्याला संचालक मंडळाची प्रत्येकी एक
katraj
katrajsakal

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता.१४) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. सोमवारी पहिल्याच दिवशी चार उमेदवारांनी मिळून पाच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कात्रज डेअरीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी (जुन्नर), माजी उपाध्यक्षा केशरबाई पवार (शिरूर), जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अरुण चांभारे (खेड) आणि कालिदास गोपाळघरे (मुळशी) आदींचा समावेश आहे. खिलारी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे या दूध संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले.

katraj
बघतोय रिक्षावाला संघटनेच्या आंदोलनकर्त्या 190 जणांवर गुन्हा दाखल

कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या १६ जागांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. इच्छुकांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता.१८) सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या संचालक मंडळाच्या १६ जागांपैकी बारामती व इंदापूर या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य ११ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक तालुका मतदारसंघ आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला संचालक मंडळाची प्रत्येकी एक, याप्रमाणे ११ जागा आहेत. दोन जागा महिलांसाठी राखीव असून उर्वरित तीन जागांमध्ये अनुसूचित जाती व जमाती (एस.सी. व एस. टी.), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्ही. जे. एन. टी.) प्रत्येकी एक जागा राखीव असल्याचे सोबले यांनी स्पष्ट केले.

katraj
पुणे : कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी तरुणाला लुटले

जुन्नर तालुका मतदारसंघातून दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केलेले बाळासाहेब खिलारी हे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. शिरूर तालुका मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या केशरबाई पवार या माजी उपाध्यक्षा व विद्यमान संचालक आहेत. मागील निवडणुकीत त्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आल्या होत्या. यंदा त्यांनी महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल न करता शिरूर तालुका मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. खेड तालुका मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अरुण चांभारे हे माजी संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आहेत. पाच वर्षाच्या खंडानंतर चांभारे हे पुन्हा जिल्हा दूध संघाच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मुळशी तालुका मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले कालिदास गोपाळघरे हे विद्यमान संचालिका वैशाली गोपालघरे यांचे पती आहेत.

सोमवारी ३८ जणांनी १३५ अर्ज घेतले

दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील ३८ इच्छुकांनी १३५ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आज उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये सर्वच संवर्गातील इच्छुकांचा समावेश असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com