Dilip Ozarkar : आई व पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले; शहीद जवानाला दिला अखेरचा निरोप

उसळलेला जनसागर आणि लक्ष लक्ष नयनातून ओघळलेले अश्रू वीर जवान दिलीप ओझरकर अमर रहे अशा जड अंतकरणातून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
Martyr Jawan Dilip Ozarkar
Martyr Jawan Dilip OzarkarSakal

कॅन्टोन्मेंट - उसळलेला जनसागर आणि लक्ष लक्ष नयनातून ओघळलेले अश्रू वीर जवान दिलीप ओझरकर अमर रहे अशा जड अंतकरणातून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

भारत मातेच्या रक्षणासाठी भारत-पाक सीमा मोहीमेवर असताना शहीद वीर जवान हवालदार कै. दिलीप बाळासाहेब ओझरकर (वय ३८) यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्यावरील धोबीघाट स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान तुझे सलाम, शहीद जवान अमर रहे, भारतभाता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी याठिकाणी देशप्रेममय वातावरण निर्माण झाले. यावेळी आई-वडील व पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणवले होते. शोकाकुल व्यक्त करण्यासाठी शहरातून ठिकठिकाणाहून हजारोंच्या संख्येत नागरिकांचा जमाव उपस्थित होता.

प्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महा. राज्य सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड, उपसंचालक लेफ्ट. कर्नल राजेंद्र जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल एस डी हंगे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार रवींद्र धंगेकर, कॅप्टन बाबू जाधव, सार्जंट आनंद ठाकूर, हवालदार सुनील काळे, सुनील भागवत, हवालदार अनिल सातव, माजी नगरसेवक अविनाश बागवे आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी संदीप लडकत, उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, रीपाई शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, विजय भोसले, ॲड प्रशांत यादव, चेतन अगरवाल, महेश जगताप, संदीप धांडोरे तसेच आदी आजी माजी सैनिक अधिकारी, राजकीय, सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी 15 जाट रेजिमेंटच्या जवानांनी हवेत फैरी झाडून शहीदास मानवंदना दिली. तसेच पसायदानाने शेवट करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com