तलावात कार कोसळली, पण तरुणांच्या सतर्कतेने वाचले तिघांचे जीव

सिद्धार्थ कसबे
Wednesday, 28 October 2020

बोरी गावाजवळील कुकडी कालव्याच्या पुलावर ही कार आली असता  वाहनचालकाचा चारचाकी वरील ताबा सुटल्याने ती कार कालव्याच्या भराव्यालगत असलेल्या तळ्यात जाऊन कोसळली.

पिंपळवंडी- बोरी- आळे(ता.जुन्नर) रस्त्यावर कुकडी कालव्या जवळच्या तळ्यात रविवारी(ता.२५)रात्री अकराच्या सुमारास मोटारकार कोसळून झालेल्या अपघातात चारचाकी मधील तिघांना वाचवण्यात जाधववाडी येथील तरुणांना यश आले आहे.

रविवारी (ता. २५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बोरी येथील एक कुटुंब आळेफाट्याकडून बोरी गावाकडे  चारचाकी वाहनाने  जात असताना  बोरी गावाजवळील कुकडी कालव्याच्या पुलावर ही कार आली असता  वाहनचालकाचा चारचाकी वरील ताबा सुटल्याने ती कार कालव्याच्या भराव्यालगत असलेल्या तळ्यात जाऊन कोसळली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचवेळी जाधववाडी येथील शुभम जाधव,गौरव जाधव व शशीकांत दाभाडे  हे मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना त्यांना वाचवा वाचवा म्हणून आवाज आला त्यांनी मोटासायकल थांबवून पाहिले असता त्यांना पाण्यात कोसळलेली कार दिसली व त्यामधील एक महिला,एक पुरुष व एक मुलगा असे तिघेजण पाण्यात  बुडत असल्याचे दिसले.रात्रीची वेळ असल्याने मदतीला कुणीही नव्हते त्यावेळी शुभम जाधव याने पाण्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्यांच्या मित्रांनी एका ट्रकला थांबवून त्यामधील दोरीच्या सहायाने  त्या तिघांना या  तरूणांनी सुखरुप पाण्याबाहेर काढले.या घटनेतील महिलेला उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कुटुंबाने दसऱ्याच्या दिवशीच नवीन कार घेतली असुन रात्री हा प्रसंग घडल्याने ते भयभीत झालेले असुन त्यांनी या तिघांचे आभार मानले आहेत.

शुभम आणि त्याचे मित्र गौरव व शशीकांत यांनी या तिन जणांना सुखरुप बाहेर काढल्याबद्दल त्यांचे तालुक्यातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

धनंजय मुंडेंसमवेत विसंवाद नाही : पंकजा मुंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car crashes into lake but the youth saved three lives

Tags
टॉपिकस
Topic Tags: