
-संतोष आटोळे
इंदापूर: वडापुरी (ता.इंदापूर) येथील दोघांचा कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवर पिंपळनेरजवळ असलेल्या कालव्यात चार चाकी पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर उत्तम बंडगर व अनिल हनुमंत जगताप (तोबरे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.