

ताम्हिणी घाटात (जि.रायगड) अवघड वळणावर अपघात प्रवण ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता दरीत थार मोटार व चार मृतदेह लांबून दिसून आले.
esakal
Tamhini Ghat Pune Accident : पुणे येथून कोकणात फिरण्यासाठी निघालेल्या थार मोटारीचा अपघात होऊन ताम्हिणी घाट (जि.रायगड) हद्दीतील सुमारे पाचशे फुट खोल दरीत कोसळली. त्यामुळे मोटारीतील सहा तरुणांचा मृत्यु झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. शोध पथकास अद्यापपर्यंत चार मृतदेह लांबून दिसून आले आहेत. इतरांचा शोध, तसेच मृतदेह दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरु आहेत. सोमवार (ता.१७) मध्यरात्री दरम्यान हा अपघात झाला असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. हा भीषण अपघात रात्रीच्यावेळी झाल्याने हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही.