पिंपरी : बंटी बबलीने पळवली मोटार

संदीप घिसे 
सोमवार, 2 एप्रिल 2018

संजय गुलाबचंद गिडवाणी (वय ३६, रा. लक्ष्मी बिल्डिंग, गुलमोहर प्लाझा, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मोनिका हर्षे दलामे (वय २८ रा. राजवीर पॅलेस, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : ओएलएक्स वरील जाहिरात पाहून आलेल्या एका दाम्पत्याने टेस्ट ड्राइव्हला मोटार घेऊन जात असल्याचे सांगत मोटारीसह पलायन केले. ही घटना पिंपळे सौदागर येथे शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी घडली.

संजय गुलाबचंद गिडवाणी (वय ३६, रा. लक्ष्मी बिल्डिंग, गुलमोहर प्लाझा, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मोनिका हर्षे दलामे (वय २८ रा. राजवीर पॅलेस, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोनिका यांनी आपली मोटार विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहून संजय गिडवाणी नामक व्यक्तीने आपल्या पत्नीसह शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता मोनिका यांच्याशी संपर्क साधला. मोनिका यांचा विश्वास संपादन करून त्यांना कोटक बँकेचा धनादेश दिला. तसेच मोटारीची टेस्ट ड्राइव्ह घेऊन येतो, असे सांगत दांपत्याने मोटार घेऊन पलायन केले. आरोपी यांनी दिलेला धनादेश गिडवाणी यांचा आहे का किंवा इतर कोणाचा आहे, याबाबत सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: car thief in Pimpri

टॅग्स