कार्डवर पेट्रोल देणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर झाल्यानंतर बॅंकांकडून 0.25 ते एक टक्का इतके शुल्क आकारण्याच्या निर्णयास देशभरातील पेट्रोल पंपचालकांनी विरोध दर्शविला आहे. मध्यरात्रीपासून या दोन्ही कार्डद्वारे पैसे स्वीकारायचे नाहीत, असा निर्णय ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला आहे. पुण्यात यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. 

एचडीएफसी बॅंकेने हे शुल्क पेट्रोल पंपचालकांकडून वसूल करण्यास सुरवात केली आहे. यापुढील काळात एक्‍सिस बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक आणि आयसीआयसीआय आदी बॅंकांही हे शुल्क वसूल करण्यास सुरवात करणार आहेत. नोटाबंदीनंतर "कॅशलेस' व्यवहाराला चालना मिळाली आहे. पेट्रोल व डिझेलसाठी "कार्ड पेमेंट' करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बॅंकांकडून आकारण्यात येणाऱ्या या शुल्कामुळे पेट्रोल पंपचालकांचा तोटा होणार आहे, असा दावा असोसिएशनने केला आहे. मुळातच पेट्रोल आणि डिझेलवर पंपचालकांना कमी प्रमाणात "कमिशन' मिळत आहे. त्यातून बॅंकांनी शुल्क वसूल केले, तर आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे देशभरातील पेट्रोल पंपचालकांनी "कार्ड'द्वारे पैसे स्वीकारायचे नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे प्रवक्‍ते अली दारुवाला यांनी कळविली आहे. पुण्यातील पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेकडून अद्याप यासंदर्भात निर्णय झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: The card will not petrol