तुम्ही सिंहगडावर गाडीने जात असाल तर सावधान..

तुम्ही सिंहगडावर गाडीने जात असाल तर सावधान..

खडकवासला - तुम्ही सिंहगडावर गाडीने जात असाल तर सावधान, नव्याने सीलकोट डांबरीकरण केल्यामुळे लहान क्रश खडीवरून वाहने घसरत आहेत, अशा तक्रारी चालकांनी केल्या. पर्यटकांनी वाहनांचा वेग कमी ठेवावा, तसेच वाहने जपून चालवावीत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले.

घाट रस्त्यातील तळई उद्यान परिसरात नुकतेच डांबरीकरण झाले. चार-पाच दिवसांत अनेक वाहने घसरून किरकोळ अपघात झाले आहेत, अशी माहिती प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी सांगितले. अनेक चालकांनी याबाबत ‘सकाळ’ला ही माहिती दिली.

सिंहगड घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच झाले. एक दीड किलोमीटरवर डांबरीकरण करताना शेवटचा थर सीलकोट केला आहे. यामध्ये, तयार झालेल्या डांबरी रस्त्यावर स्प्रे मशीनने डांबर मारले जाते. त्यावर, लहान खडी म्हणजे क्रश मारली जाते. या मुळे रस्त्यावरील डांबरीकरण अधिक घट्ट होण्यास मदत मिळते. त्यात पावसाचे पाणी, रस्त्यावर पडलेले पाणी, आत जाऊन रस्ता खराब होऊ नये, म्हणून हा सीलकोटचा थर वापरला जातो. यातील ही खडी रस्त्यात चिकटणे आवश्‍यक आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जयंत काकडे यांनी सांगितले. नवीन रस्ता झाल्याने वाहने जोरात जात आहेत. घाटात उतरताना उतार असल्याने अनेक चालक गिअर न्यूट्रलमध्ये ठेवतो. त्यामुळे वाहनाचा वेग वाढतो. वेग, उतार व वळण असल्याने अपघाताची शक्‍यता आहे,  असे वन अधिकारी दीपक पवार यांनी सांगितले. चालकांनी वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवावा, असे आवाहन बांधकाम विभाग व वन विभागाने  केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com