कोरोना उद्रेकाचं मोठं कारण पुणेकरचं! बेशिस्त नागरिकांचा सगळ्यांना फटका

careless people who did not wear masks paid fine of Rs 2 crore in one month
careless people who did not wear masks paid fine of Rs 2 crore in one month
Updated on

पुणे : मार्च महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे जिल्हा, महापालिका, आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून नागरीकांना मास्क परिधान करण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यास सुरू केले. पण काही नागरीकांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. एवढेच नाही, तर मास्क न परिधान न करता फिरणाऱ्या अशा 36 हजार बहाद्दरांनी अवघ्या एक महिन्यातच तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा दंड भरला. काही लोकांच्या अशा बेशिस्तपणाचा फटका थेट पुणेकरांच्या जीवावर उठत असल्याची शहरातील धक्कादायक परिस्थिती आहे.

खेड-शिवापूर टोल नाक्यावरून प्रवास करताय, मग ही बातमी नक्की वाचा

मागील वर्षी मार्च महिन्यात शहरात सुरू झालेल्या कोरोना संसर्गाची वाढ सप्टेंबर महिन्यात अक्षरशः शिगेला पोचली होती. त्यानंतर हे प्रमाण हळूहळू कमी झाले होते. मात्र मार्च महिन्यापासून शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळण्यास सुरू झाले. त्यामुळे जिल्हा, महापालिका, आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून पुन्हा एकदा नागरीकांनी मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणेस नियमीत हात धूणे याबाबत जनजागृती करण्यास सुरूवात झाली. विशेषतः सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी नागरीकांनी मास्कचा वापर करण्याबाबत प्रशासनाने कडक भुमिका घेण्यास सुरूवात केली. त्यानुसारच, पोलिस व महापालिका प्रशासनाकडून मास्क परिधान न करणाऱ्यांवर पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

एकीकडे प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड करीत असताना, दुसरीकडे अनेक नागरीक मास्क परिधान करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची सद्यस्थिती आहे. अशा नागरीकांवर शहरातील सर्व पोलिस ठाणे व वाहतुक पोलिसांकडून दररोज दंडात्मक कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. शहरामध्ये 1 ते 31 मार्च या कालावधीमध्ये 36 हजार 576 जणांवर मास्क परिधान न केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी एक कोटी 77 लाख 15 हजार 800 रुपये इतका दंड घेतला आहे. पुणे पोलिसांनी मागील वर्षीपासून 14 मार्च 2021 पर्यंत 2 लाख 57 हजार 693 जणांवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून 12 कोटी 64 लाख 72 हजार 200 इतका दंड वसुल केला होता.

पुण्यातील २० टक्के हॉटेल पुन्हा बंद

''शहरात मध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असूनही काही नागरीक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात पुणेकरांना मोठया जीवघेण्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भिती आहे. त्यामुळे पुणेकरांच्या जिवित संरक्षणासाठी व कोरोना संसर्गाला नियंत्रण घालण्यासाठी मास्क परिधान न करणाऱ्या नागरीकांवर नाईलाजाने दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाई पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून आपल्या जबाबदारीचे भान बाळगले पाहिजे. स्वतःच्या आरोग्यरक्षणाला प्राधान्य देण्यासाठी नागरिकांनी मास्कचा नियमीत वापर करावा. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.'' 
मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com