

Pune Metro Raw Meat Ban
ESakal
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात मेट्रो प्रवासादरम्यान फक्त सीलबंद मांसाहारी पदार्थांना परवानगी आहे. तर कच्चे मांस, उघडे मांसाहारी पदार्थ आणि सुके मासे पिशव्यांमध्ये किंवा उघड्यावर नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. शिजवलेले शाकाहारी किंवा मांसाहारी अन्न कंटेनर किंवा पॅकेजमध्ये नेले जाऊ शकते, परंतु प्रवासादरम्यान ते मेट्रोच्या आत खाण्यास परवानगी नाही.