
पुणे : ‘कार्टूनिस्ट कम्बाइन’ संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत आहेत. मात्र, बाळासाहेबांनी स्थापन केलेली मूळ संस्था बंद पडली आहे. आताची ‘कार्टूनिस्ट कम्बाइन’ संस्था बोगस आहे, असा आरोप काही व्यंग्यचित्रकारांनी केला आहे. ‘कार्टूनिस्ट कम्बाइन’चे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने व्यंग्यचित्रकारांनी नाराजी व्यक्त केली.