मुलांसाठी व्यंगचित्रकार कार्यशाळा

मुलांना कार्टूनिंगची मूलभूत कौशल्ये शिकवणे आणि कॉमिक्ससाठी त्यांची स्वतःची कार्टून पात्रे तयार करण्यासाठी प्रगत तंत्रे शिकवणे हा या कार्यशाळेचा उद्देश
cartoonist
cartoonistsakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी व्यंग्यचित्रकला कार्यशाळा आयोजित केली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या व्यंग्यचित्रकला संग्रहालयातर्फे ३० जुलै रोजी ही कार्यशाळा घेण्यात येईल. मुलांना कार्टूनिंगची मूलभूत कौशल्ये शिकवणे आणि कॉमिक्ससाठी त्यांची स्वतःची कार्टून पात्रे तयार करण्यासाठी प्रगत तंत्रे शिकवणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.

कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, व्यंग्यचित्रकार सूरज एस्के श्रीराम हे मुलांना मार्गदर्शन करतील. कार्यशाळेच्या समारोपानंतर, मुलांना ‘सहभागाचे प्रमाणपत्र’ मिळेल. कार्यशाळेसाठी नोंदणी करण्यासाठी कृपया www.unipune.ac.in या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रेस रिलीज सेक्शनमध्ये दिलेली माहिती वाचून संपर्क साधावा. कार्यशाळेची नोंदणी २० मुलांपर्यंत मर्यादित आहे आणि ती प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने केली जाईल.

कार्यशाळेसाठी आवश्यक

- स्केच बुक/ड्रॉइंग पेपर

- पेन्सिल आणि खोडरबर

- रंगीत साहित्य जसे की रंगीत पेन्सिल, मार्कर किंवा क्रेयॉन इ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com