बीआरटी मार्गात अपघात झाल्यास 'नो क्लेम, नो इन्शुरन्स'

संदीप जगदाळे
बुधवार, 4 एप्रिल 2018

हडपसर - बीआरटी मार्गात वाहनांचा अपघात झाल्यासइन्शुरन्ससाठी केल्म करता येणार नाही, असा फलक प्रशासनाच्यावतीने लावण्यात आला आहे. तरी देखील अनेक खासगी वाहने या मार्गातून धावतात. सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरी देखील बिनधक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत. बीआरटी प्रशासनाने या मार्गावर जागोजागी वॅार्डन नियुक्त केले आहेत. मात्र त्यांना न जुमानता सर्रास वाहने या मार्गातून धावत आहेत. खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे बीरआटी मार्गात वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. खासगी वाहनांसाठी असलेली लेन कमी पडत असल्यामुळे नागरिक बीआरटी मार्गातून जातात.

नागरिक सतीश जगताप म्हणाले, बीआरटीतून खासगी वाहने जातात. कारण खासगी वाहनांसाठी असलेली लेन वाहतूकीसाठी कमी पडते. नाईलाजास्तव वाहनचालक वाहने बीआरटी मार्गातून घालतात. त्यामुळे प्रशासनाने खासगी वाहनांसाठी असलेली लेनची रूंदी वाढवावी. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सदोष बीआरटीची अम्मलबजावणी होत असल्यानेच या मार्गावर अपघात वाढले आहेत.

याबाबत एलआयसी ऑफ इंडियाचे एमडीआरटी मेंबर उदय जगदाळे म्हणाले, बीआरटीत अपघात झाल्यास वाहनांचे नुकसान झाल्यास विम्याचा क्लेम मिळत नाही. लाईफ इन्शुरन्सचा क्लेम मिळणे अथवा नाकारणे हे प्रत्येक कंपनीच्या पॅालिसीनुसार ठरते. तसेच पीएमपी बसेस करीता हा रस्ता राखीव असल्याने पीएमपीएलवर वाहनचालकांना क्लेम करता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहन चालकांनी बीआरटी मार्गातून वाहने चालवू नयेत. 

Web Title: In case of accident on BRT road, no claim, no insurance