उर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा 

संदीप घिसे 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) - पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले. ही घटना चिंचवड येथे घडली. या प्रकरणी उर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

माजी सरपंच राऊत, ठाकूर (दोघेही रा. उर्से, ता. मावळ) आणि कारके अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश शंकर पवार (वय ३४, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी पवार यांचे मालक दीपक कुमार गुप्ता यांना पैशाच्या व्यवहारांच्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, इंदिरानगर, चिंचवड येथून अपहरण केले. जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत कोठेही जाऊ देणार नाही, असे सांगून गुप्ता यांना यांना डांबून ठेवले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव करीत आहेत.

Web Title: case against three kidnappers including former Sarpanch of Ursa village