
सौरभ दत्तात्रय चोरगे (वय 20, रा. आंबेगाव पठार) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. सौरभने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. त्यास भरपूर मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणींवर आपली छाप पाडण्यासाठी तो विविध प्रकारे प्रयत्न करत असे. त्यापैकी काही मैत्रिणींनी फिरायला जाण्याची आवड होती. त्यामुळे सौरभला चांगल्या व महागड्या दुचाकींची गरज भासत होती. अखेर त्याने मैत्रिणींची फिरायला जाण्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरीला सुरवात केली. एक, दोन नव्हे तर त्याने पाच दुचाकी चोरल्या.
पुणे : तुम्ही तुमच्या मैत्रीणीचे लाड, हट्ट पुरविण्यासाठी काय कराल, तर तुम्ही तिला फिरायला, शॉपींगला घेऊन जाल किंवा एखादा रोमॅंटिक चित्रपट दाखवाला, पण एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला 'लाँग ड्राईव्ह'ला घेऊन जाण्यासाठी, तिच्यावर आपली स्वतःची छाप पडावी, यासाठी चक्क वेगवेगळ्या कंपन्यांच्या व महागड्या दुचाकी चोरीचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. या "मजनू'पर्यंत दत्तवाडी पोलिसांचे "लंबे हात' फक्त पोचलेच नाहीत, तर त्यांनी त्याच्याकडून चोरलेल्या पाच दुचाकीही जप्त केल्या.
सौरभ दत्तात्रय चोरगे (वय 20, रा. आंबेगाव पठार) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. सौरभने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. त्यास भरपूर मैत्रिणी आहेत. त्या मैत्रीणींवर आपली छाप पाडण्यासाठी तो विविध प्रकारे प्रयत्न करत असे. त्यापैकी काही मैत्रिणींनी फिरायला जाण्याची आवड होती. त्यामुळे सौरभला चांगल्या व महागड्या दुचाकींची गरज भासत होती. अखेर त्याने मैत्रिणींची फिरायला जाण्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरीला सुरवात केली. एक, दोन नव्हे तर त्याने पाच दुचाकी चोरल्या.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, चोरी केलेली दुचाकी घेऊन तो शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागूल उद्यान कमानीपासून पुढे असलेल्या पुलावर थांबला होता. त्यावेळी तेथे चोरीची दुचाकी घेऊन एक तरुण थांबला असल्याची खबर गुप्त बातमीदाराने दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार कुंदन शिंदे व सागर सुतकर यांना दिली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार शिंदे व सुतकर यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी त्यांना सौरभ तेथे थांबल्याचे दिसले. त्यांनी त्यास अडवून दुचाकीबाबत विचारणा केली, त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा, त्याने दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.
आळंदीत उद्यापासून संचारबंदी ; धर्मशाळा, लॉजिंगमध्ये निवासास बंदी