शेतकऱ्याकडे मागितली 20 हजारांची लाच; लिपिकावर गुन्हा दाखल

bribe
bribe

दौंड - शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या लिपिकावर अखेर 50 दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. जमीन हद्द निश्चित करताना पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. शिरुर तालुक्यातील ही घटना असून पोलिस उप अधीक्षक कार्यालयातील लिपिकावर गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी आणि तांत्रिक विश्लेषण झाल्यानतंर ही कारवाई झाली आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांनी या बाबत माहिती दिली.  सुरेश रमाकांत कदम (वय ३४, रा. वायरलेस फाटा, गिरीम, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. दौंड शहरातील पोलिस उप अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दौंड व शिरूर तालुक्यांचा समावेश आहे.

चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथील एका शेतकऱ्याला त्यांची वडिलोपार्जित जमिनीची हद्द निश्चित करण्याकरिता सशुल्क पोलिस बंदोबस्त हवे होते. त्यासाठी त्यांनी 31 ऑक्टोबर 2020 रोजी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्ज पुढील कार्यवाहीसाठी दौंड उप अधीक्षक कार्यालयात आले होते. तेथील लिपिक सुरेश कदम याने पोलिस बंदोबस्त मंजुरीसाठी संबंधित शेतकऱ्याचे मित्र विक्रम शितोळे यांच्याकडे निरोप देत मंजुरीसाठी वीस हजार रूपयांची मागणी केली.

संबंधित शेतकऱ्याने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर 18 डिसेंबर रोजी उप अधीक्षक कार्यालय व परिसरात सापळा रचण्यात आला होता. तडजोड होऊन वीस ऐवजी पंधरा हजार रूपये दिल्यानंतर पोलिस बंदोबस्तास मंजूरी देण्याचे लिपिक याने कबूल केले होते. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक शरद गोर्डे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com