
शिक्रापूर : आपल्या गटाच्या रोहिणी दत्तात्रय गिलबीले या उपसरपंचपदी विराजमान होताच त्यांच्या सत्कारासाठी सरसावलेल्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल यांच्यासह पंधरा जणांवर कोरोनाकाळातील सोशल डिस्टंसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अशाच प्रकारचा गुन्हा माजी सभापती मंगलदास बांदलांवर चार महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आला होता. दरम्यान आजच्या गुन्ह्यात बांदल यांच्या बरोबरच विद्यमान सरपंच हेमलता राऊत, नवनिर्वाचित रोहिणी गिलबीले, रामभाऊ सासवडे व राजाभाऊ मांढरे आदींचाही समावेश आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोमवारी (ता.१७) शिक्रापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदाच्या निवडणूकीत रोहिणी गिलबीले यांची एका मताच्या फरकाने निवड झाली. पाच वर्षांपूर्वी बांदल गटाच्या हातून सत्ता गेली होती मात्र, मोठ्या राजकीय कौशल्याने बांदल गटाने आपली सत्ता प्रस्थापित करीत सरपंच-उपसरपंच दोन्ही ठिकाणी आपली माणसं खुर्चीवर बसविली. याच अनुषंगाने गेल्या तीन वर्षात दोन सरपंच व सहा उपसरपंच मोठ्या खुबीने बसविलेल्या बांदल गटाच्या रोहिणी गिलबीले यांची निवड उपसरपंचपदी होताच मोठ्या जल्लोषात सर्व बांदल गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामपंचयात स्थळी धावले व त्यांनी गिलबीले यांचा जाहीर सत्कार केला. अनेकांना मास्क नाही, सोशल डिस्टंसिंग नाही. अशा स्थितीत झालेल्या या सत्काराचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल होताच शिक्रापूर पोलिसांचेवतीने पोलिस नाईक तेजस लक्ष्मण रासकर यांच्या फिर्यादीनुसार पाच माणसांपेक्षा जास्त जणांनी एकत्र येणे, तोंडावर मास्क परिधान न करणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे आदी साथीचे रोग अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले. वरीलप्रमाणे गुन्हे दाखल होणारांमध्ये रेखा बांदल, रामभाऊ सासवडे, राजाभाऊ मांढरे, नवनाथ सासवडे, जनार्दन दोरगे, दत्तात्रय गिलबीले, भगवानराव वाबळे, दिलीप वाबळे, जयश्री दोरगे, आण्णा हजारे, नाना गिलबीले, आकाश गिलबीले व विद्यमान सरपंच हेमलता राऊत व उपसरपंच रोहिणी गिलबीले आदी एकुण १५ जणांचा सहभाग आहे.
दरम्यान, चार महिन्यांपूर्वी एका शेतात साऊंड सिस्टीम लावून कोरोना काळातील शासन नियम न पाळण्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर गोपनिय विभागाचे पोलिस नाईक ब्रम्हा पवार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे दाखल होण्याला राजकीय संदर्भ असण्यावरही जिल्हात अनेक चर्चा झडल्या होत्या. दरम्यान गेल्या पाच महिन्यात शिक्रापूर व परिसरात सुमारे दिडशे रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झालेले आहेत. त्यातील सहा ते सात जण कोरोनाने मृतही पावलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर तरीही सोशल डिस्टंसिंग पाळले जात नसल्याने शिक्रापूर पोलिसांनी घेतलेल्या आजच्या कारवाईचे शिक्रापूरात स्वागत झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.