बांगलादेशी नागरिक ठरवून धमकाविल्याने मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

फिर्यादी हे शनिवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांच्या गुलमोहर अर्पाटमेंटमधील घरामध्ये पत्नी व मुलांसमवेत बसले होते. त्यावेळी मनसेचे अजय शिंदे, सचिन काटकर यांच्यासह सात ते आठ जण फिर्यादी यांच्या घरामध्ये बेकायदा घुसले. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांच्यासह दिलशाद अहमद हसन (वय 35) व बप्पी नेमाई सरदार (वय 30) अशा तिघांना बांगलादेशी नागरीक ठरविले

पुणे : बांगलादेशी नागरिक ठरवून त्यांच्या घरात बेकायदा घुसून त्यांना तुम्ही बांगलादेशी नागरीक आहात, तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सहकानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसेच्या आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

अजय शिंदे, सचिन काटकर यांच्यासह आठ जणांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, दुसऱ्याच्या घरात बेकायदा प्रवेश करणे व धमकाविणे या स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोशन नुरहसन शेख (वय 35, रा. गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार

फिर्यादी हे शनिवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांच्या गुलमोहर अर्पाटमेंटमधील घरामध्ये पत्नी व मुलांसमवेत बसले होते. त्यावेळी मनसेचे अजय शिंदे, सचिन काटकर यांच्यासह सात ते आठ जण फिर्यादी यांच्या घरामध्ये बेकायदा घुसले. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांच्यासह दिलशाद अहमद हसन (वय 35) व बप्पी नेमाई सरदार (वय 30) अशा तिघांना बांगलादेशी नागरीक ठरविले. "तुम्ही बांगलादेशी आहात, तुम्हाला भारतात राहण्याचा मुळीच अधिकार नाही. अशी धमकी दिली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सलूनमध्ये शिरुन दोघांवर केले ब्लेडने वार; दिली जिवे मारण्याची धमकी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case filed against MNS party workers for threatening Indian people