esakal | ...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार

बोलून बातमी शोधा

False God Man sexually assaulted five sisters in Pimpri

भोंदूबाबाने फिर्यादी महिलेला सांगितले की, ''तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी एका बाईने करणी केली आहे. घरात गुप्तधनाच्या पाच पेट्या आहेत. देवाची मूर्ती व दागिने आहेत. यासह घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे.'' दरम्यान, पुत्र प्राप्ति व गुप्तधन देण्यासाठी घरात तीन उतारे व लग्न पूजा करावी लागेल, असे भोंदूबाबाने फिर्यादी महिलेला सांगितले.  तसेच पंधरा दिवसात पूजा न केल्यास घरातील सर्व सदस्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी दाखवली.

...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पुत्रप्राप्तीच्या बहाण्याने तसेच घरातील गुप्त धन काढून देण्यासाठी भोंदूबाबने पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केला. या भोंदूबाबाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32, रा. मु.पो.खैरेवाडी, ता. रोहा,जि. रायगड )असे भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

भोंदूबाबाने फिर्यादी महिलेला सांगितले की, ''तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी एका बाईने करणी केली आहे. घरात गुप्तधनाच्या पाच पेट्या आहेत. देवाची मूर्ती व दागिने आहेत. यासह घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे.'' दरम्यान, पुत्र प्राप्ति व गुप्तधन देण्यासाठी घरात तीन उतारे व लग्न पूजा करावी लागेल, असे भोंदूबाबाने फिर्यादी महिलेला सांगितले.  तसेच पंधरा दिवसात पूजा न केल्यास घरातील सर्व सदस्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी दाखवली.

सलूनमध्ये शिरुन दोघांवर केले ब्लेडने वार; दिली जिवे मारण्याची धमकी

फिर्यादी महिलेच्या कुटुंबियांकडून पैसे घेऊन पूजा करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने फिर्यादीच्या पाच बहिणींना बंद खोलीत नेले. बंद खोलीत पाचही बहिणींवर लैंगिक अत्याचार केला. तसेच  याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुमच्या आई-वडिलांना काळ्या जादूने मारून टाकीन, अशी धमकी पाचही बहिणींना दिली. याबाबत फिर्यादी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

''भाजी विकू नको सांगितले'' म्हणून भाजीवाल्याचा आठ पैलवानांसह सोसायटीत राडा