Lockdown : संचारबंदीत 'तीनपत्ती जुगार' खेळण्याची भारी हौस! मग काय पोलिसांनी दिला 'प्रसाद'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

घडलेला प्रकार असा. कोरोनामुळे  शहरात संचारबंदी आहे. त्यामुळे चार ते पाच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे. त्याबाबत पोलिसांकडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. असे असतानाही मंगळवारी दुपारी तीन  वाजता हडपसरमधील पापडे वस्तीवर मात्र ५ ते ६ जण एकत्र येऊन तीनपत्ती जुगार खेळत असल्याची खबर हडपसर पोलिसाना मिळाली.
 
पुणे : शहरात संचारबंदी सुरू आहे, नागरिकांना एकत्र फिरण्यास मनाई आहे, असे असतानाही हडपसरमध्ये ५ - ६ जण मात्र तीनपत्ती जुगार खेळण्यात दंग होते. पोलिसांना खबर मिळाली आणि पुढे पोलिसांचा 'प्रसाद' आणि त्यांच्या नावावर गुन्हा दाखल होण्याचे बक्षीस मात्र त्यांना प्राप्त झाले !

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रामदास बाबासाहेब कांबळे, संजय शिवाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर राजेंद्र कामठे, विनायक यशवंत अलाहाबादे, नारायण गणा ढावरे, यशवंत अरुण बनसोडे अशी गुन्हा दाखल क
झालेल्यांची नावे आहेत.

कोरोनामुक्ती मुंबई-पुण्यासाठी लांबचा पल्ला; राज्यातील ५ जिल्हे कोरोनामुक्त, आणखी १ जिल्हा उंबरठ्यावर

घडलेला प्रकार असा. कोरोनामुळे  शहरात संचारबंदी आहे. त्यामुळे चार ते पाच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे. त्याबाबत पोलिसांकडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. असे असतानाही मंगळवारी दुपारी तीन  वाजता हडपसरमधील पापडे वस्तीवर मात्र ५ ते ६ जण एकत्र येऊन तीनपत्ती जुगार खेळत असल्याची खबर हडपसर पोलिसाना मिळाली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. साडेसहा हजार रुपयांची रोकड जप्त केली. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case filed against six for Gambling during Lock down by pune police