esakal | मराठे ज्वेलर्स'चे बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime logo

'मराठे ज्वेलर्स'चे बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठे ज्वेलर्समध्ये गुंतवणुक केलेले पैसे परत मिळण्यासाठी मराठे यांना शिवीगाळ करून त्यांच्या मुलाला, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी संशयित आरोपींनी दिली होती. दीप्ती सरोज काळे (रा. बावधन, उत्तमनगर) आणि निलेश उमेश शेलार (रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नी निना बळवंत मराठे (वय 60, रा. रुपाली सोसायटी, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली.

हेही वाचा: कोरोना संसर्गाशी संग नको! लक्षणे दिसल्यानंतर उशिरा चाचणी बेतू शकते जिवावर

हा प्रकार 2018 ते डिसेंबर 15 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे (वय 60) हे नामांकीत "मराठे ज्वेलर्स'चे मालक होते. आर्थिक कारणामुळे त्यांनी 15 डिसेंबर 2020 या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानामध्येच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. 27 डिसेंबरला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या मुलाकडे चौकशी केली, तेव्हा व्यावसायातील मंदी व आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे जबाबामध्ये नोंदविले होते. दरम्यान, त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली.

हेही वाचा: कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

काळे व शेलार यांनी मराठे ज्वेलर्समध्ये पैशांची गुंतवणूक केली होती. गुंतवणुक केलेले पैसे परत मागण्यासाठी काळे व शेलार यांनी मराठे यांच्या घरी व येत होते. तेथे आल्यानंतर ते त्यांना अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करीत होते. कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची तसेच त्यांच्या मुलाचे बरेवाईट करण्याची ते धमकी देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मराठे यांना आत्महत्या केली. त्या दोघांनीच मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.