नागरिकांना लुटणाऱ्या 'मुन्नाभाई' डॉक्टरवर गुन्हा दाखल; कुठलीही डिग्री नसताना करायचा उपचार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

स्वागत तोडकर याच्याकडे महाराष्ट्र वैद्यक परिषदेची कुठलीही पदवी नसतानाही तो उपचारांसाठी आलेल्या नागरीकांची तपासणी करीत होता. तसेच त्यांच्याकडून पैसे घेत होता.

पुणे : महाराष्ट्र वैद्यक परिषदेची कुठलीही पदवी नसतानाही डॉक्‍टर असल्याचे भासवून नागरीकांची तपासणी करीत त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीनंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बोगस डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वंशाच्या दिव्यासाठी सासरचे करायचे छळ; अखेर कंटाळून तिनं संपवलं जीवन​

स्वागत बळीराम तोडकर (रा. कात्रज) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्‍टरचे नाव आहे. याप्रकरणी महापालिकेच्या परिमंडळ तीनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले (वय 44, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील पीएमपीएल बसस्थानक परिसरातील गल्लीत तोडकर निसर्गोपचार केंद्र आहे. संबंधीत ठिकाणी स्वागत तोडकर याच्याकडे महाराष्ट्र वैद्यक परिषदेची कुठलीही पदवी नसतानाही तो उपचारांसाठी आलेल्या नागरीकांची तपासणी करीत होता. तसेच त्यांच्याकडून पैसे घेत होता.

रेल्वे प्रवास महागणार; आता विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकावर आकारले जाणार दर​

हा प्रकार महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. पखाले यांना समजला. फिर्यादी यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधीत बोगस डॉक्‍टरविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैव चिवडशेट्टी करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case has been registered against bogus doctor at Bharati University police station