राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Flag

महाराष्ट्र दिनानिमित्त फडकवलेला राष्ट्रध्वज सायंकाळी सुर्यास्तापुर्वी न उतरवता तब्बल तीन दिवस फडकत ठेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी राजगड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापका विरुध्द तक्रार दाखल करुन घेतली.

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

नसरापूर - सावरदरे, ता. भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त फडकवलेला राष्ट्रध्वज सायंकाळी सुर्यास्तापुर्वी न उतरवता तब्बल तीन दिवस फडकत ठेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी राजगड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापका विरुध्द तक्रार दाखल करुन घेतली असुन, इतर तीन शिक्षका विरुध्द देखिल या घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी ठपका ठेवला आहे.

या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई योगेश राजीवडे यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी माहीती देताना सांगितले कि, 1 मे ऱोजी महाराष्ट्र दिना निमित्त सावरदरेच्या जिल्हा परिषद शाळेसमोर शाळेचे मुख्याध्यापक संजय भगवंत पापळ रा. सासवड, ता. पुरंदर, शिक्षक प्रविण खंडेराव नांदे रा. आळंदे, ता. भोर, अमजद अब्बाद पटेल रा. खंडाळा, ता. खंडाळा. व सौ. शितल कृष्णा टापरे रा. खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा. यांनी ग्रामपंचायत सदस्य पोपट किसन पापळ यांच्या हस्ते सर्व लोकांच्या उपस्थितीत देशाचा राष्ट्रध्वज फडकावला. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर शासकीय नियमाप्रमाणे सदरचा राष्ट्रध्वज त्याच दिवशी 1 मे रोजी सायंकाळी सुर्यास्ताच्या अगोदर मानवंदना देऊन उतरवणे आवश्यक होते. शाळेतील शिक्षकांची ही जबाबदारी असताना मात्र, सायंकाळी कोणीही ध्वाजाकडे फिरकले नाहीत. तब्बल दोन रात्र तीन दिवस ध्वज फडकत राहीला. हा राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याने मुख्याध्यापक संजय पापळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर तीन शिक्षकांना देखिल जबाबदार धरण्यात आले आहे.

याबाबत नागरीकांकडुन माहीती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पोलिस शिपाई योगेश राजीवडे यांना ता. 3 रोजी दुपारी तातडीने सावरदरे गावात पाठवले या ठिकाणी पोलिसांनी दुपारी तीन वाजता योग्य सन्मानाने राष्ट्रध्वज उतरवला व ताब्यात घेतला.

या बाबत भोरच्या गटशिक्षणाधिकारी अश्वीनी सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता या घटने बाबत माहीती मिळाली असुन, दाखल केलेल्या तक्रारी नुसार संबधीत शिक्षकांवर कारवाईसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत व सुज्ञ नागरीकांचे देखिल दुर्लक्ष

सावरदरे, जिल्हा परिषद शाळेत फडकवलेला झेंडा उतरवण्यात आला ऩाही. या बाबत शिक्षकांची बेजबाबदार वृत्ती समोर आली असली तरी तब्बल तीन दिवस ग्रामपंचायत व नागरीकांनीही या घटनेकडे दुर्लक्षच केले असल्याचे दिसते तिसरया दिवशी गावच्या काही सुज्ञ नागरीकांनी या बाबत पोलिसांपर्यंत माहीती पोहचवली.

Web Title: Case Has Been Registered Against The Headmaster For Insulting The National Flag

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimeNational Flag
go to top