औंध रुग्णालयात ‘केस पेपर’ मिळाले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पुणे - औंध येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना अखेर ‘केस पेपर’ मिळाले; पण रुग्णालय प्रशासनाच्या अनास्थेमुळेच केस पेपरचा रुग्णालयात दुष्काळ पडला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पुणे - औंध येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना अखेर ‘केस पेपर’ मिळाले; पण रुग्णालय प्रशासनाच्या अनास्थेमुळेच केस पेपरचा रुग्णालयात दुष्काळ पडला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या रुग्णाला देण्यासाठी एकही ‘केस पेपर’ शोधून सापडत नसल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील चक्रे वेगाने फिरली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सी. एस. शेळके यांनी तातडीने गाडी येरवडा कारागृहातील मुद्रणालयात पाठविली असता एक लाख केस पेपर रुग्णांसाठी उपलब्ध केल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हा रुग्णालयातील केस पेपर संपल्यानंतरही ते तातडीने मागविण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केस पेपरचा दुष्काळ हा फक्त जिल्हा रुग्णालयात नसून राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांमध्येही असतो, असा पवित्रा जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला होता. याबाबत डॉ. शेळके म्हणाले, ‘‘एक लाख नवीन केस पेपर आणले असून, ते रुग्णांना उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्षी या केस पेपरची मागणी मुद्रणालयात नोंदविली होती.’’ कारागृहातील मुद्रणालयाचे व्यवस्थापक नरेश गोटे म्हणाले, ‘‘रुग्णालयातील कर्मचारी केस पेपर घेऊन गेले आहेत. रुग्णालयातर्फे कोणतीही नवीन मागणी नोंदविलेली नव्हती. आधी नोंदविलेल्या मागणीमध्ये काही शंका होत्या. त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता.’’

Web Title: case paper to aundh hospital