'भाई स्टाइल' बड्डे 'त्यांना' महागात पडला; पाच जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

सोनू भिसे याचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी केक आणला होता. ते सर्वजण शनिवारी सायंकाळी एनआयबीएम रोडवरील लॉ वेंटेना मॉलसमोर रस्त्यावर जमले होते.

पुणे : मराठी चित्रपटामधील 'भाईचा बड्डे' गाण्यातील केक कापण्याच्या सीननंतर सध्या स्वतःला भाई समजणाऱ्यांमध्ये तलवार आणि कोयत्याने केक कापण्याचे फॅड निर्माण झाले आहे. शहरातील भर रस्त्यात अशा प्रकारे केक कापण्याचे अनेक प्रकार होत आहेत. असेच एक सेलिब्रेशन एनआयबीएम रस्त्यावर शनिवारी (ता.१२) सायंकाळी घडले. त्यामुळे भर रस्त्यात कोयत्याने केक कापणाऱ्या पाच जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांना म्हणतात...​

अक्षय अमरुषी शेलार (वय 22, रा. सिद्धार्थनगर), कुणाल प्रताप लोणकर (वय 19, रा. पांडुरंग अळी), सोनू भिसे, रोहन कसबे आणि गणेश चराटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. यातील अक्षय आणि कुणाल यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिस नाईक नीतेश टपके यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू भिसे याचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी केक आणला होता. ते सर्वजण शनिवारी सायंकाळी एनआयबीएम रोडवरील लॉ वेंटेना मॉलसमोर रस्त्यावर जमले होते. केक चाकूने कापण्याऐवजी त्यांनी तो कोयत्याने कापला. हा सर्व प्रकार रस्त्यावरून जाणारे येणारे लोक पाहत होते. या केक कापण्याचे शूटिंगही काहींनी केले.

'नीट'ला वेळ पडला अपुरा; 'ओएमआर'शीट भरण्यात विद्यार्थ्यांचा गेला वेळ!​

याबाबत लोकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यामुळे पोलिस मार्शल आणि कोंढवा तपास पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. इतर तिघे तोपर्यंत पळून गेले होते. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र, बंदूका आणि शारीरिक इजा होईल, असे हत्यार बाळगण्यास मनाई आहे. त्यांनी या आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case registered against five persons for cutting cake with a sharp object at Kondhwa