संतापजनक! जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग; दोघा डॉक्टरांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

योगेश भद्रा व अजय बागलकोट अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरची नावे आहेत. याप्रकरणी एका 25 वर्षीय महिला डॉक्टरने फिर्याद दाखल केली आहे. नव्याने सुरु झालेल्या जम्बोमध्ये उपचारांआभावी रुग्णचे मृत्यु झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. ते प्रकरण शांत होत नाही, तोपर्यंत 33 वर्षीय महिला तेथून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाला आणखी धारेवर धरण्यात आले.

पुणे  : कोरोनाग्रस्त रुग्णसाठी 'संकटमोचक' ठरु पाहणारे शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमागील संकट दूर होण्याची चिन्हे दिसेनात. रुग्णालयातील एका महिला डॉक्टरचा दोन डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगेश भद्रा व अजय बागलकोट अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरची नावे आहेत. याप्रकरणी एका 25 वर्षीय महिला डॉक्टरने फिर्याद दाखल केली आहे. नव्याने सुरु झालेल्या जम्बोमध्ये उपचारांआभावी रुग्णचे मृत्यु झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. ते प्रकरण शांत होत नाही, तोपर्यंत 33 वर्षीय महिला तेथून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाला आणखी धारेवर धरण्यात आले.

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

दरम्यान, शनिवारी संबंधित मुलगी सापडली. त्यानंतर काही वेळातच जम्बोतील एका महिला डॉक्टरने तिच्यासमवेत काम करणाऱ्या भद्रा व बागलकोट अशा दोन डॉक्टरने विनयभंग केल्याची फिर्याद दाखल केली. फिर्यादी व संशयित आरोपी यांची एका खासगी एजन्सीमार्फत जम्बोमध्ये नेमणूक करण्यात आली होती. मागील एक महिन्यापासुन दोन्ही डॉक्टरचे महिला डॉक्टरला उद्देशुन अश्लील बोलत होते. महिला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर त्यांनी अधिक प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केली.अखेर महिला डॉक्टरने दोघाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पुणे : जम्बो कोविड सेंटरमधली तरुणी पिरंगुटच्या घाटात पोहोचली कशी?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case of registered against two doctors in Jumbo for molesting a female doctor