Pune News : ८० हजार ७७० रूपयांची वीज चोरी प्रकरणी नारायणगाव येथे दोन जणांवर गुन्हा दाखल

वीज कंपनीच्या कार्यक्षेत्रात ८० हजार ७७० रुपये किमतीची ५ हजार १३५ युनिटची वीज चोरी करून वीज कंपनीचे आर्थिक नुकसान
case registered against two people in Narayangaon theft of electricity worth Rs 80 thousand pune crime
case registered against two people in Narayangaon theft of electricity worth Rs 80 thousand pune crimeesakal

नारायणगाव : येथील वीज कंपनीच्या कार्यक्षेत्रात ८० हजार ७७० रुपये किमतीची ५ हजार १३५ युनिटची वीज चोरी करून वीज कंपनीचे आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी हॉटेल मालक व शेतकरी आशा दोन जणांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश दरंदाळे (राहणार नारायणगाव,ता.जुन्नर), गौतम भुजबळ ( राहणार वारूळवाडी, ता.जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

गौतम भुजबळ याचे येथील पुणे नाशिक महामार्गा लगत हॉटेल आहे.गौतम भुजबळ याने मीटर जवळ वायर ट्यापींग करून बायपास कनेक्शन करून विज वापर सुरू करून ६७ हजार ६७० रुपयांची ३ हजार ५०१ युनिट विज चोरी केली असल्याचे तपासणीत आढळून आले.

राकेश दरंदाळे याने वीज वाहक तारेवर अवैधरित्या आकडा टाकून कृषी पंप सुरू करून तेरा हजार रुपयांची १ हजार ६३४ युनिट विज चोरी केली असल्याचे तपासणीत आढळून आले. दोघांनाही वीज चोरी केल्या प्रकरणी तडजोड रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

मात्र संबंधित व्यक्तींनी वीज चोरीचे बील भरण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्या विरोधात सहाय्यक अभियंता ऋषिकेश बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com