esakal | शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

ज्य़ेष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबत बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याप्रकरणी दोन ट्विटर खातेधारकांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बारामतीचे उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनीच ही तक्रार दाखल केली आहे.

शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - ज्य़ेष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबत बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याप्रकरणी दोन ट्विटर खातेधारकांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बारामतीचे उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनीच ही तक्रार दाखल केली आहे. vedashree@vedashree_19 व Raje Harshvardhan Shastri या खातेधारकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक वर्षांपासून  पदाधिकारी आहेत. आज त्यांचे मित्र अजित कदम (रा. जळोची, बारामती) यांनी शरद पवार यांच्याविषयी वेदश्री नावाच्या एका मुलीने बदनामीकारक मजकूर लिहिला असून पवारांच्या छायाचित्रासह तो प्रसिद्ध केला असल्याचे तसेच या ट्विटला राजे हर्षवर्धन नामक खातेधारकाने दिलेल्या प्रतिक्रियेतही पवार यांच्याबद्दल बदनामी केल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात टाकला कचरा

अभिजीत जाधव यांनी याबाबत योग्य ती खात्री केल्यानंतर हा मजकूर शरद पवार यांची बदनामी करणारा असल्याची त्यांची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी लगेचच बदनामी करणाऱया दोघांविरोधात पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून सायबर विभागामार्फत याची चौकशी केली जाणार आहे. 

कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष

बदनामी करणे अयोग्य
दरम्यान शरदचंद्रजी पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची काहीही कारण नसताना बदनामी करण्याचा प्रकार चीड आणणारा आहे, असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, त्या बाबत कायदेशीर कारवाई आम्ही निश्चितपणे करु- अभिजीत जाधव, उपनगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद.

Edited By - Prashant Patil

loading image