एसटी अन् बसमध्ये चोऱ्याचे प्रकार थांबता थांबेना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात वृद्ध महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने, रोकड असा तब्बल अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. तर तीन दिवसांपुर्वी स्वारगेट येथे एसटीतुन एका महिला प्रवाशाचे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला

पुणे : एसटी व बसमधील चोऱ्यांचे प्रकार थांबण्याची चिन्हे नसल्याने प्रवाशी मात्र त्रस्त झाले आहेत. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात वृद्ध महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने, रोकड असा तब्बल अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. तर तीन दिवसांपुर्वी स्वारगेट येथे एसटीतून एका महिला प्रवाशाचे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला. 

 तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे 
 

याप्रकरणी वृद्ध महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुळच्या नगर येथील आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या पुण्यात आल्या होत्या. त्यांनी सकाळी आठ वाजता पुणे ते औरंगाबाद या मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांच्याकडील बॅग त्यांनी एसटी बसमधील लोखंडी जाळीवर ठेवली. दरम्यान, त्यांचे लक्ष नसल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांची बॅग चोरुन नेली. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व कपडे असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
 

दरम्यान, स्वारगेट एसटी स्थानकाच्या परिसरामध्ये तीन दिवसांपुर्वी एका महिला प्रवाशाच्या पिशवीतील सव्वा लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना घडली. महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला प्रवासी या रायगड जिल्ह्यातील रोहा गावच्या रहिवासी आहेत. त्या दिवेआगार येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवेश करत होत्या. बसमध्ये चढताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडील पिशवीतील सव्वा लाखाचे दागिने चोरुन नेले. या स्वरुपाच्या घटना स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी स्थानक, बसस्थानक, बसथांबे या ठिकाणी सातत्याने घडत आहेत. काही ठिकाणी बसमध्ये चढून लॅपटॉप चोरीच्या घटनाही घडल्या असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cases of theft at ST and bus are increasing