atalbihari vajpayee medical college pune
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापकपदी भरती करताना याच रुग्णालयात कंत्राटी काम करणाऱ्या प्रत्येक प्राध्यापकाकडून प्रत्येकी साडेतीन महिन्यांचा पगार म्हणजे आठ लाख ते तेरा लाख रुपये घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यापैकी ११ डॉक्टरांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे. नोकरी न मिळालेल्या तिघांनी यात पैसे घेतल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त, महापौर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.