निरगुड्यात बिबट्यासाठी पिंजरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

जुन्नर - बाँब फोडा अन्‌ बिबट्या पळवा या ‘सकाळ’मधील बातमीची दखल घेऊन वन विभागाने निरगुडे (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. माजी सरपंच ऊर्मिला बोडके यांनी याची माहिती दिली.

बोडके यांच्या घराबाहेर भरदिवसा पायऱ्यांवर, तर कधी घरामागील आंब्याच्या बागेत येणारी बिबट्याची मादी व तिच्या बछड्यांची निरगुडे येथे गेल्या काही महिन्यांपासून दहशत आहे. परिसरातील अनेक पाळीव व भटक्‍या कुत्र्यांचा त्यांनी फडशा पाडला आहे.

ग्रामपंचायतीने बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती; परंतु त्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले. दोन-तीन दिवसांपूर्वी बोडके यांच्या घराच्या कंपाउंडवरून बिबट्या आला होता. ही बाब वन विभागास कळविण्यासाठी जुन्नर गाठले. पण साहेबांची भेट झाली नाही. अखेर फोन केला तेव्हा एक कर्मचारी फटाक्‍यांचे बॉक्‍स घेऊन आला आणि ते वाजविण्याचा सल्ला देऊन निघून गेला. पण बिबट्याला पकडण्याचे नाव घेतले नाही. बछडेही मोठे झाले आहेत, यामुळे त्यांना पकडण्याची मागणी बोडके यांनी वन विभागाकडे केली होती. तशी बातमी ‘सकाळ’ने दिली होती.

Web Title: catcher for leopard by forest department