esakal | Pune। शाळेत जाताना ‘सावधान’!
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेत जाताना ‘सावधान’!

शाळेत जाताना ‘सावधान’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरासह ग्रामीण भागात येत्या सोमवारपासून (ता. ४) शाळांची घंटा वाजणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीने पुन्हा एकदा शाळांचा आवार गजबजणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच तब्बल दीड वर्षांपासून घरातून शिक्षण घेणारे विद्यार्थी पुन्हा शाळेत येणार आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे निर्माण झालेली शिक्षणातील दरी, विद्यार्थ्यांची मानसिकता, शैक्षणिक विकास याचा विचार करून शाळेतील शिक्षकांसह पालकांनीही आता सावध पावले उचलण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक आणि पालक स्वत: काही मार्गदर्शक सूचना घालून घेत आहेत.

हेही वाचा: आश्रम फक्त साक्षीदारच!

राज्यात ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून (ता.४) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांनी आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी नेमकी काळजी कशी घ्यावी, याबाबत टिप्स दिल्‍या आहेत.

पालकांची जबाबदारी

 • मनातील भीती घालवून मुलांना

 • शाळेत जाण्यास प्रवृत्त करणे

 • मुलांच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांना पूर्वकल्पना देणे

 • शाळेतून विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याला स्नान करण्यास सांगावे

 • शिक्षणातील दरी दूर करण्यासाठी शिक्षकांशी समन्वय साधणे

 • मुलांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाला प्राधान्य द्यावे

 • भीती दूर करण्यासाठी वेळोवेळी मुलांशी सकारात्मक संवाद साधावा

 • ऑनलाइन वर्गात आतापर्यंत शिकविलेल्या अभ्यासाचा आढावा घ्यावा

 • मुलांसोबत सॅनिटायझर, पाण्याची बाटली, तोंडाला मास्क अशी पूर्वतयारी करावी

शिक्षकांची जबाबदारी

 • विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करणे

 • पहिले एक-दोन आठवडे थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी.

 • मुलांच्या पूर्वज्ञानाचा आढावा घेऊन त्यानुसार स्तरनिहाय अध्ययन करावे

 • पालकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी त्यांचे उद्‌बोधन करावे

 • मुलांच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा पालकांशी चर्चा करून घ्यावा

 • विद्यार्थ्यांच्या आताच्या मानसिकतेचा विचार करून काही विशेष उपक्रम घ्यावेत

 • सातत्याने विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधावा

 • सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सूचना द्याव्यात

 • देशातील ८२% विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक

हेही वाचा: श्रीधर फडके यांची भावना; ‘गदिमा जीवनगौरव’ प्रदान

देशातील ८२ टक्के विद्यार्थी आता प्रत्यक्षात शाळेत येण्यास उत्सुक असल्याचे ‘ब्रेनली’ या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. घरातून शिक्षण घेण्याच्या वातावरणाशी विद्यार्थी जुळवून घेतले असले, तरी कोणतेही तंत्रज्ञान मैत्री आणि संवादाची जागा घेऊ शकत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

‘ब्रेनली’तर्फे घेतलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी घरातूनच अभ्यास करण्याच्या वातावरणाशी चांगले जुळवून घेतले असले, तरी ते प्रत्यक्षात वर्गात परत जाण्यास उत्सुक आहेत. कोणतेही तंत्रज्ञान मैत्री आणि संवादाची जागा घेऊ शकत नाही. प्रत्यक्ष वर्गात पाठविण्यास पालक अनुकूल असल्याचा ६१ टक्के विद्यार्थ्यांचा दावा आहे. तर ८२ टक्के विद्यार्थ्यांच्या शाळा अजूनही शिकविण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत, असे स्पष्ट निरीक्षण ‘ब्रेनली’चे सीपीओ राजेश बिसानी यांनी नोंदविले आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. परंतु विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी पालकांसमवेत ऑनलाइन बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना सांगितल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचा गृहपाठ शक्यतो ऑनलाइन पद्धतीनेच तपासला जावा, यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत पाठविताना, शाळेतून घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यावी, याच्या सूचना पालकांना दिल्या जात आहेत.- मेधा सिन्नरकर, प्राचार्य, लक्ष्मणराव आपटे प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज शाळांमध्ये असावे ‘हेल्थ क्लिनिक’

प्रत्येक शाळेमध्ये शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक सुरू करावे. याद्वारे विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेंपरेचर तपासले जावे. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) किंवा स्थानिक निधीतून खर्च करावा, या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शिक्षण विभागाने २४ सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशात अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

पुणे विभागातील शाळा : २,८८४

नगर ८५०

पुणे ९४७

सोलापूर १,०८७

विद्यार्थ्यांची संख्या ७,३२,७७६

नगर २,४०,४४०

पुणे २,४०,३९४

सोलापूर २,५१,९४२

loading image
go to top