'तिकोना' गडावर आढळली गुहा

cave
cave

पुणे : 'तिकोना गडाच्या पायथ्याला राहून पर्यटकांना चहा नाश्त्या सोबत लिंबुशरबत विकून व्यवसाय चालविणाऱ्या  गुरुदास मोहन या युवकाचे साहित्य माकडाने पळविले होते. ते पुन्हा मिळविण्यासाठी गुरुदास हा माकडामागे गवताळ परिसरात खोल दरीच्या दिशेने गेला होता तेव्हा त्याला ही गुहा सापडली. ही बाब त्याने गडावर संवर्धन करणाऱ्या भटकंती दुर्गसंवर्धन संस्थाचे पद अधिकारी किरण चिमटे आणि शिवदुर्ग संवर्धन संस्था यांना कळवली.

गुहेचं रहस्य उलगडण्यासाठी खडतर डोंगरात मार्ग शोधत अत्याधुनिक ड्रोन आणि गडावरील चपळ हुशार पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन सर्व दुर्गप्रेमी निलेश ठाकर, चंद्रकांत लोळे, कृष्णा पांचाळ, दिनेश बोडके,चेतन वाघमारे व अक्षय औताडे अशोक आडकर, मनोहर सुतार गुहेच्या अंतर्गत भागात पोहचले यात त्यांना खूप प्रमाणात खापरांचे तुकडे भेटले  आहेत.  गुहेच्या आतील बाजूस अंदाजे 2 फूट उंचीचा छोटा मार्ग आहे. यात झोपूनच प्रवेश केला जाऊ शकतो. गुहेतील या अंतर्गत भागात प्राणवायूचा धोका असू शकतो म्हणून यांनी आतमध्ये प्रवेश केला नाही. तज्ज्ञांनी याची दखल घ्यावी अशी मागणी सर्वांनी केली.  हे सर्व चित्रीकरण गडप्रेमींसाठी प्रसिद्ध केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com