CBIकडून NDA च्या प्राचार्यांविरुद्ध चार्जशीट दाखल; बनावट कागदपत्रांद्वारे केली होती शिक्षक भरती

NDA
NDA

पुणे - बनावट कागदपत्रे बनवुन शिक्षक भरती राबविल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीच्या (एनडीए) प्राचार्याविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबाीआय) विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 'सीबीआय"ने मे 2018 मध्ये "एनडीए"च्या प्राचार्यासह पाच शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

प्रबोधिनीच्या प्राचार्या विरोधात मंगळवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. एनडीए मध्ये शिक्षक नेमणुकीसाठी बनावट कागदपत्रे सादर करून नेमणूक करून घेतल्याच्या आरोपावरून ’एनडीए’च्या प्राचार्यासह पाच प्राध्यापकांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबाआय) 8 मे 2018 रोजी गुन्हा दाखल केला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

’एनडीए’चे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यांच्यासह राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख जगमोहन मेहेर, रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक वनिता पुरी, रसायनशास्त्र विभाग प्रमुख माहेश्वर रॉय व गणित विभागातील सहायक प्राध्यापक राजीव बन्सल अशा  पाच जणांविरुद्ध 8 मे 2018 या दिवशी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) 'एनडीए'मध्ये शिक्षकांची नेमणूक केली जाते. एनडीएमध्ये 2007 ते 2013 या कालावधीमध्ये शिक्षकांच्या नेमणुका झाल्या होत्या. एनडीएमध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक होण्यासाठी अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणवत्ता दाखला, शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक (एपीआय) अशी वेगवेगळी प्रमाणपत्रे लागतात. यापैकी काही प्रमाणपत्र या शिक्षकांनी बनावट तयार केली. ती सादर करून 2011 मध्ये एनडीएमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीवर रुजू झाले. शुक्ला हे 2011 पासून प्राचार्य पदावर काम करत आहेत. इतर संशयित आरोपी हे सहायक प्राध्यापक म्हणून काम काम करीत आहेत. अशा प्रकारे खोटी कागदपत्रे सादर करुन त्यांनी संरक्षण मंत्रालयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सीबाआयने  या प्रकरणाचा तपास करुन सीबीआयच्या विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com