येस बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह पुण्यात सीबीआयचे छापे

येस बँकेतील गैरव्यवहार आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईसह पुण्यात काही ठिकाणी छापे मारले आहेत.
Yes-Bank
Yes-BankSakal
Updated on
Summary

येस बँकेतील गैरव्यवहार आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईसह पुण्यात काही ठिकाणी छापे मारले आहेत.

पुणे - येस बँकेतील (Yes Bank) गैरव्यवहार (Non-behavior) आणि मनी लॉण्डरिंग (Money Landering) प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) (CBI) मुंबर्इसह पुण्यात काही ठिकाणी छापे (Raid) मारले आहेत. या प्रकरणात दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएफएचएल) शी व्यवहार केलेल्या संबंधितांच्या मालमत्ता असलेल्या ठिकाणी मुंबई, पुण्यात छापे टाकले आहेत.

पुणे आणि मुंबई एकूण सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यामध्ये रेडियस ग्रुपच्या मालमत्ता असलेल्या ठिकाणीही छापेमारी झाल्याची माहिती समोर आली आहे. येस बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याला अटक करण्यात आली आहे. राणा कपूर बँकेचा सीईओ असताना सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यापैकी २० हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

Yes-Bank
पोलिस उपनिरीक्षकाने उकळली अडीच लाखांची खंडणी

त्याचबरोबर राणा यांनी सुमारे २०२.१० कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचाही सहभाग आहे. कपूर यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण ७८ कंपन्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे कागदावर दाखवण्यासाठी या २० हजार कोटी पैकी संबंधित कंपन्यांना कर्ज दिली गेली आहेत का? याचा तपास तपास यंत्रणा करीत आहेत.

रेडियस ग्रुपने मुंबई उपनगरात बांधकाम प्रकल्पासाठी डीएचएफएलच्या माध्यमातून तीन हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. रेडियस आणि समर ग्रुपमध्ये संयुक्त भागिदारीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पण या प्रकरणात कर्जाचा वापर हा योग्य गोष्टीसाठी न झाल्याचे आढळले आहे. तर आणखी एका प्रकरणात ही रक्कम कुटुंबीयांच्या नावे वळविण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात निदर्शनास आले आहे. डीएचएफएलचे कपिल आणि धीरज वाधवान यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये दोघांना अटक करण्यात आली होती. तर येस बॅंक गैरव्यवहारात कपूर तळोजा कारागृहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com