बारामतीत सार्वजनिक गणेशोत्सवात एक सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रम

4cctv_camera_2_0.jpg
4cctv_camera_2_0.jpg

बारामती : यंदाच्या गणेशोत्सवात बारामतीतील सार्वजनिक गणेशोत्सवाने एक मंडळ एक सीसीटीव्ही कॅमेरा हा विधायक उपक्रम राबवावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.  गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत आज ते बोलत होते. तहसिलदार हनुमंत पाटील, मुख्य़ाधिकारी योगेश कडुसकर, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ व विठ्ठल दबडे या प्रसंगी उपस्थित होते.

पखाले म्हणाले, बारामतीच्या सर्वच गोष्टींचा आदर्श इतर ठिकाणी घेतला जातो, यंदा वर्गणीमधील काही रक्कम खर्च करुन शहरात मंडळानजिक सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श आपण घालून देऊ. शहरात नोंदणी असलेली 93 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रत्येकाने एक कॅमेरा बसवला तरी शहरात संवेदनशील ठिकाणी 93 कॅमेरे होतील त्याचा फायदा गुन्हेगारी रोखण्यासाठी होईल. 

गणेशमूर्तींची सुरक्षितता, महिलांसाठी स्वतंत्र रांगा, स्वयंसेवकांचे चोवीस तास लक्ष असणे, वर्गणी गोळा करताना योग्य त्या परवानग्या घ्याव्यात, डॉल्बी व गुलालविरहीत गणेशोत्सव असावा, शांततेची परंपरा कायम ठेवावी या बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम सादर करताना मनोरंजन जरुर हवे पण समाजप्रबोधनावरही भर द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी यंदाही विसर्जनासाठी कृत्रीम कुंड तयार केले जाणार असून निर्माल्य गोळा केले जाणार असल्याचे सांगितले. नगरपालिका विसर्जन मिरवणूकीत पाकळ्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणार आहे. दरम्यान शहर पोलिस ठाण्यात मंडळांना सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी योजना करण्यात येईल, सर्वांनी रितसर परवानगी घ्यावी असे आवाहन अशोक धुमाळ यांनी केले. विठ्ठल दबडे यांनी आभार मानले. 

पोलिसांतर्फे गणराया अँवॉर्ड
बारामती पोलिसांच्या वतीने विधायक व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा गणराया अँवॉर्ड दिली जाणार असल्याचे संदीप पखाले यांनी जाहिर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com