शिवाजीनगर न्यायालयात सीसीटीव्हींचा ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पुणे - शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील महत्त्वाच्या ठिकाणांवर आता सीसीटीव्हींच्या माध्यमातून ‘वॉच’ ठेवणार आहे. न्यायालयातील प्रवेशद्वारांसह आतील भागातील सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यासाठी सुमारे २४६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्या कामाला सुरुवात झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यायालयात गर्दीचा फायदा घेऊन कोणताही गैरप्रकार घडू नये व इतर कोणत्याही घटना झाल्यास त्याचा माग काढता यावा. त्यामुळे कॅमेरे बसविण्याची मागणी वकील व पक्षकारांनी अनेक दिवसांपासून केली होती. सध्या न्यायालयातील गेट क्रमांक तीन व चारवर आणि त्यानंतर उर्वरित ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांची बैठक झाली. पुढील काम गतीने पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे (पीबीए) अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी दिली. कॅमेरे महत्त्वाच्या भागांमध्ये बसविण्यात येणार असून, त्याचे रेकॉर्डिंग पोलिस आयुक्तालयामध्ये होणार आहे, असे पीबीएचे उपाध्यक्ष ॲड. सचिन हिंगणेकर यांनी सांगितले.

आणखी वाचा - निकालापूर्वीच भाजपनं मान्य केला पराभव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV Watch in pune shivajinagar court