‘सकाळ’च्या बारामती विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

‘सकाळ’च्या बारामती विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी समाजाच्या सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत ‘सकाळ परिवारा’ला शुभेच्छा दिल्या.

बारामती - ‘सकाळ’च्या बारामती विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी समाजाच्या सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत ‘सकाळ परिवारा’ला शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील चिराग गार्डन येथे रंगलेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक सम्राट फडणीस यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. ‘सकाळ’वर प्रेम करणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्‍यातील असंख्य वाचकांसह विविध मान्यवरांनी व्यक्तिशः सकाळ परिवारातील सर्वांना भेटून सदिच्छा व्यक्त केल्या. अनेक वाचकांनी यानिमित्ताने काही सूचनाही केल्या.

मायबोलीला विसरणार नाही...

बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त ॲड. नीलिमा गुजर, शारदानगरचे सीईओ नीलेश नलावडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव जवाहर वाघोलीकर, विश्वस्त मिलिंद वाघोलीकर, विकास लेंगरेकर, प्राचार्य डॉ. सी. व्ही. मुरुमकर, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, एसटीचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर व मिलिंद मोरे, गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, बीएसएनएलचे संजय मोरे, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आवर्जून  उपस्थित राहून ‘सकाळ’ला शुभेच्छा दिल्या.

यावेळी निवासी संपादक रमेश डोईफोडे, सहयोगी संपादक नयना निर्गुण, जाहिरात व्यवस्थापक मकरंद पावनगडकर, वितरण व्यवस्थापक योगेश निगडे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate the anniversary of Baramati Divisional Office sakal