आंदर मावळात बैलपोळयाचा सण उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

टाकवे बुद्रुक : हलगी तुता-याचा ठेका, ढोल लेझीमचा दणदणाट आणि बॅड पथकाच्या तालावर, आंदर मावळात बळीराजाच्या हौसेच्या बैलपोळयाचा उत्साहात साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यात भाद्रपद अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. वर्षे भर शेतात राबणाऱ्या सर्जाराजाला आज पुरणपोळीचा नैवेद्याने भरवले. 

वर्षभर ज्या मानेवर लाकडाचे जोखड ठेवली ती मान, पायाचे खूर शेतकऱ्यांनी स्वत:च्या हाताने चोळून लाडक्या वृषभराजाला अंघोळ घातली. पाठीवर लाल पिवळ्या निळ्या हिरव्या रंगाने रंगवून झुल काढली.डोळयात काजळ भरून शिंगाना चवरे गुंफली. शिंगाचा  चकचकीत पणा वाढीसाठी शिंगाना सोनेरी लावली. पायात तोडे,गळ्यात घुंगरमाळ आणि वशिंडाला कापडाची मखमली साज शृंगार करून सजलेले बैलजोडी वेशीतून गावात प्रवेशली.

गावचे पोलीस पाटील अतुल असवले यांच्या सहकार्याने गावातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात बैलजोडीची मिरवणूक काढली. बैलजोडीच्या गळ्यात बांधलेले नारळ, लिंबू, नोटांची माळ तोडण्यासाठी तरूणाने साहस दाखविले.शर्यतीच्या बैलजोडीला जितका मानसन्मान तितकाच सन्मान वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीने आज मिळवला.आंदर मावळातील ठोकळवाडी व आंद्रा धरणाचे आजचे काठ सकाळच्या पहिल्या प्रहरी बैलजोडीच्या हंबरडयाने दुमदुमले. सायंकाळ गोठ्यात मस्त रवंथ करीत गेली. सर्जाराजाच्या उत्साहाला जितके उधाण होते, तितकेच त्याच्या कारभा-याला आणि त्याच्या लेकरांना होते.
 
Web Title: Celebrating bailpola festival in Andher Maval