जुन्नर, बादशहा तलाव, चिंचोली परिसरात बकरी ईद साजरी  

दत्ता म्हसकर
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

जुन्नर :जुन्नर शहर व परिसरात आज बुधवार ता.२२ रोजी सामुदायिक नमाज व दुवा पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाने बकरी ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्नरच्या दिवाणे अहेमद मशिदी पासून हाफिज मौलाना इमरान बेग यांच्या नेतृत्व खाली मिरवणुकीने मुस्लिम बांधव सामूहिक नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर जमा झाले.

जुन्नर :जुन्नर शहर व परिसरात आज बुधवार ता.२२ रोजी सामुदायिक नमाज व दुवा पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाने बकरी ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्नरच्या दिवाणे अहेमद मशिदी पासून हाफिज मौलाना इमरान बेग यांच्या नेतृत्व खाली मिरवणुकीने मुस्लिम बांधव सामूहिक नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर जमा झाले.

येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना, पोलिस निरीक्षक सुरेश बोडखे यांनी उपस्थित  मौलाना व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या तर ईदगाह कमिटीच्या वतीने राष्ट्रीय एकता मंचचे अध्यक्ष हाजी मिर्झा कुद्दुस बेग, व जमीर कागदी यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधिकारी व पदाधिकारी यांचा सत्कार केला.
  
त्याग व बलिदानाचे पार्श्वभूमी असलेल्या ईद उल अजहा म्हणजे बकरी ईद निमित्त शहरातील पिरजादे वाडा, खलिलपुरा, माई मोहल्ला, दिवाणे अहेमद, संगतराश, कादरीया मशीद, जुम्मा मशीद या प्रमुख मशिदी मध्ये अनुक्रमे मौलाना सुफियान हाफिज, मौलाना रिजवान कुरेशी, सादिकुल ईस्लाम, मौलाना रफिक, हाफिज इदरिस रब्बानी, हाफिज मोहसिन व मौलाना नाहिद रजा यांच्या उपस्थितीत व सर्वात शेवटी १०-३० वाजता ईदगाह मैदान येथे हाफिज मौलाना इमरान बेग यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज व दुवा पठणाचा मुख्य धार्मिक कार्यक्रम पार पडला.  

'जातीय सलोखा, एकमेकांच्या धर्माचा आदर व सन्मान करीत, देश व मानव जातीच्या उध्दारासाठी आपल्या परिसरात शांतता  राहिल याकरिता नेहमी अग्रेसर रहा' असे आवाहन हाफिज इमरान बेग यांनी यावेळी केले तर सामूहिक दुवा पठण झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान बादशहा तलाव येथे बिलाली मशिदीत मौलाना शाकिब रजा यांच्या नेतृत्व खाली नमाज पठण झाले.  चिंचोली गावाच्या मुख्य मशीदितही नमाज व दुवा पठण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 
 

Web Title: Celebrating Bakri Id in Junnar, Badshah Lake, Chincholi area