डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा : एम. एन. आगवणे

प्रफुल्ल भंडारी 
शनिवार, 14 एप्रिल 2018

दौंड (पुणे) : भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून विज्ञानाच्या जोरावर प्रगती करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. अंधश्रध्दांपासून दूर राहत शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या साह्याने प्रत्येकाने स्वतःचा जीवनस्तर उंचावून देशाच्या प्रगती मध्ये योगदान द्यावे, असे आवाहन आॅल इंडिया गार्ड कौंसिलचे विभागीय अध्यक्ष एम. एन. आगवणे यांनी केले आहे. 

दौंड (पुणे) : भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून विज्ञानाच्या जोरावर प्रगती करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. अंधश्रध्दांपासून दूर राहत शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या साह्याने प्रत्येकाने स्वतःचा जीवनस्तर उंचावून देशाच्या प्रगती मध्ये योगदान द्यावे, असे आवाहन आॅल इंडिया गार्ड कौंसिलचे विभागीय अध्यक्ष एम. एन. आगवणे यांनी केले आहे. 

दौंड येथील मुख्य रेल्वे यार्ड मास्टर कार्यालयाजवळ आज (ता. १४) दुपारी आयोजित डॅा. बाबासाहेब आंबेडकर जंयती व महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त बोलताना एम. एन. आगवणे यांनी हे आवाहन केले. रेल्वेचे स्टेशन व्यवस्थापक पी. के. शुक्ला, वाहतूक निरीक्षक आर. बी. सिंह, रेल्वे यार्ड मास्टर ए. के. यादव, सेवानिवृत्त पोलिस उप अधीक्षक नारायणराव राजगुरू, माजी गट शिक्षणाधिकारी गौतम बेलखेडे, माजी निबंधक नारायण शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. ए. एस. पवार अध्यक्षस्थानी होते. आर. एल. शिवणकर व सहकार्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  

एम. एन. आगवणे म्हणाले, `` डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतावादी, मानवतावादी व शांतताप्रिय समाजाच्या निर्मितीसाठी केलेला त्याग विचारात घेऊन त्यांच्या संदेशांचा अंगीकार केला पाहिजे. त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यास केला तर त्यांचे विचार किती व्यापक आणि विज्ञानवादी आहेत याचा प्रत्यय येईल. औपचारिक शिक्षणासह सामाजिक, व्यवहारिक व राजकीय ज्ञान मिळवावे परंतु हे करताना कोणाला हिणवायचे नाही, याचे स्मरण ठेवावे. डॅा. आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे माणसाकडे माणूस म्हणून पाहत मानवतेची सेवा करावी. ``

गौतम बेलखेडे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. जितेंद्र शिंदे, महादेव घारड, एन. डी. नाडगौडा, बी. वाय. जगताप यांनी या वेळी विचार व्यक्त केले. जॅान पॅाल, एस. एस. शिंदे, डी. एन. निकम, श्री. कोकरे, अस्लम सय्यद, ए. एम. कांबळे, प्रसाद जोगदंड, आदी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयोजनासाठी सहकार्य केले.   

ए. डी. साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर एस. एस. भंगारे यांनी आभारप्रदर्शन केले. आॅल इंडिया गार्ड कौंसिलच्या वतीने शहरतील बुध्दविहाराच्या बांधकामासाठी वीस हजार रूपयांची देणगी या वेळी संबंधितांकडे सुपूर्त करण्यात आली. 

Web Title: celebration of babasaheb ambedkar jayanti in daund