पुणे - सांगवी, दापोडीत बाबासाहेबांना अभिवादन 

रमेश मोरे
शनिवार, 14 एप्रिल 2018

सांगवी (पुणे) : जुनी सांगवी,दापोडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त विविध संस्था,सामाजिक संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

सांगवी (पुणे) : जुनी सांगवी,दापोडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त विविध संस्था,सामाजिक संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

येथील रोहित राज युवा प्रतिष्ठानच्या वतीने नगरसेवक रोहित काटे यांच्या हस्ते डॉ. बाबा साहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी समीर शेख, विक्की किंडरे,जावेद नदाफ उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गट यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार करण्यात आला यावेळी मा. नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे ,अजय झुंबर,नंदू भुजंग,सचिन तोरणे ,उपस्थित होते. भारीप बहुजन महासंघाच्या वतीने दापोडी विभाग  चंद्रकांत गायकवाड  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुहास देशमुख, अमित सुरवसे, शिवराज कांबळेआदी उपस्थित होते.येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर युवा मंचाच्या  वतीने मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात आजारी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी गोपाळ मोरे,शैलेश ओव्हाळ, सुनिल कांबळे ,इसताफ शेख ,अमिन शेख उपस्थित होते. सतिश हेल्थ अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने अन्नदान व गरजूंना कपडे वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  
अखिल भारतीय रामोशी समाजाच्या  वतीने अध्यक्ष दिपक माकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे सौदागर आरोग्य कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे प्रतिमेस आरोग्य निरीक्षक श्री राकेश सौदाई आरोग्य सहाय्यक दिपक माकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.

जुनी सांगवी येथील मधुबन मित्र मंडळाच्या वतीने मधुबन सोसायटी येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी पिं.चि.म.न.पा.च्या स्थायी अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्य३त आले.मधुबन मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा संविधान प्रतिमा भेट देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे,संतोष कांबळे,शारदा सोनवणे, अंबरनाथ कांबळे,जवाहर ढोरे,हिरेन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन गणेश ढोरे यांनी केले.तर आभार रविंद्र गायकवाड यांनी मानले.

Web Title: celebration of babasaheb birth anniversary in sangavi dapodi