वळसे पाटलांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच आंबेगाव तालुक्यात जल्लोष

वळसे पाटलांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच आंबेगाव तालुक्यात जल्लोष

मंचर : राज्याच्या गृहमंत्री पदी दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर आंबेगाव तालुक्यात गावोगावी गावकऱ्यांनी पेढे लाडू वाटून फटाक्यांची आताषबाजी करून जल्लोष साजरा केला. मंचर येथे मंगळवारी (ता. ६) आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, उद्योजक दीपक हिंगे पाटील व मंचर ग्रामपंचायत सदस्या ज्योती निघोट यांनी पुढाकार घेऊन एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केला.

यावेळी नलिनी वरपे, कावेरी कस्तुरे, कमल गावडे, वैशाली खिलारी, मनीषा गावडे, कार्तिकी फल्ले, दिपाली हिंगे, स्वाती गोसावी, आदी  महिलांनी दिलीप वळसे पाटील, शरद पवार,  अजितदादा पवार, सुप्रिया सुळे जिंदाबादच्या घोषणा दिल्या.अवसरी खुर्द येथे सरपंच जगदीश अभंग, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर, आनंदराव शिंदे, दिनकर खेडकर, उपसरपंच स्नेहा टेमकर व गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

“सन १९९० पासून सलग सात वेळा दिलीप वळसे-पाटील  आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून वाढत्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मतदारसंघाचा कायापालट केल्यामुळे गावोगावी आर्थिक सुबत्ता येण्यास मदत झाली आहे. कार्यक्षम नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आहे. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे दिलीप वळसे पाटील यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हानात्मक असलेल्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी उर्जा, अर्थ, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, कामगार या खात्यांना न्याय देण्याची भूमिका समर्थपणे पार पाडली आहे. त्याप्रमाणेच गृहविभागालाही न्याय देतील. पोलीस दलामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. पूर्वीप्रमाणे पोलीस खात्याला वैभव मिळवून देण्याचे काम वळसे पाटील करतील.” असा विश्वास शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी व्यक्त केला आहे. 

आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांना महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील समर्थपणे पेलून पोलीस खात्याचा अभिमान सार्थ ठरवतील. अशी खात्री  बाळगतो, असे वळसे पाटील यांचे एकेकाळचे जिवलग मित्र, माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी ट्विटरवर वळसे पाटील यांच्याविषयी स द्भावना व्यक्त करून अभिनंदन केले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com