esakal | तळेगाव ढमढेरे येथे ज्येष्ठा गौरी उत्सव उत्साहात साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी उत्सव

तळेगाव ढमढेरे येथे ज्येष्ठा गौरी उत्सव उत्साहात साजरा

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात ज्येष्ठा गौरी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी अनेक घरामध्ये गौरींचे स्वागत करून पूजन करण्यात आले. सोमवारी महिलांनी हळदी- कुंकू वाहून या उत्सवाचा आनंद लुटला. आकर्षक सजावट, रंगीबेरंगी फुलांच्या माळा, समोर विविध फळांची व वस्तूंची रेलचेल, सर्वांचे लक्षवेधून घेणारी सजावट व गौराईंचे देखणे रूप पाहून महिलांनी समाधान व्यक्त केले. गेल्या वर्षीपेक्षा

हेही वाचा: OBC आरक्षणाशिवायच होणार ZP निवडणुका, तारीख जाहीर

चालू वर्षी कोरोनाचे संकट थोडेसे कमी झाल्याने गौरी- गणपती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हळदी- कुंकू समारंभाला महिलांनी चांगली दाद दिली. चालू वर्षी पर्यावरणपूरक उत्सवावर बऱ्याच ठिकाणी भर दिला असल्याचे निदर्शनास आले.

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, करंजावणे, भाबर्डे आदी गावात गौरी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

loading image
go to top