कर्नाटकातील यशाबद्दल इंदापुरात भाजपचा जल्लोश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

भिगवण (पुणे) : कर्नाटकात भाजपला मिळालेले यश व त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडी नंतर येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने इंदापुर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल (ता.17) जल्लोष केला. 

येथील मदनवाडी चौफुला येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे, दिनानाथ मारणे, माउली मारकड, राजेंद्र जमदाडे आदी कार्यकर्त्यांनी   फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी बोलताना अशोक वणवे म्हणाले, देशात 21 राज्यात भारतीय जनता पार्टीने आपले सरकार स्थापन केले असुन 15 राज्यात स्वबळावर तर 6 राज्यात मित्र पक्षांशी आघाडी करुन सरकार स्थापन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कॉंग्रेस मुक्त भारतच्या दिशेने झपाट्याने वाटचाल चालु असल्याने लवकरच देश भाजपमय होणार असल्याने देशातील जनता  आनंदोत्सव साजरा करत आहे. भारत महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे विचार आत्मसात करुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन वणवे यांनी केले.

Web Title: celebration of karnataka results in indapur