जुन्नर - मुक्ताईदेवी यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक व पारंपारिक सोंगे

दत्ता म्हसकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरमधील खालचा माळीवाडा येथील मुक्ताई देवी यात्रोत्सवानिमित पालखी मिरवणूक तसेच नागरिकांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून  सोंगे काढली. जुन्नरच्या नागरिकांना योगी आदित्यनाथ, अण्णा हजारे, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आदींच्या वेशभूषा साकारत जातीयवाद व भ्रष्टाचाराला थारा नको अशा आशयाचे संदेश तसेच जनतेची दिशाभूल करणारे व आर्थिक घोटाळे करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीचे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला, युवक तसेच नागरिक सहभागी झाले होते.      

उत्सवानिमित्त पालखी मिरवणूक जुन्नर शहरातून काढून गोळेगाव येथील मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावर्षी अगला चौकीदार (PM) कैसा हो? योगी आदित्यनाथ जैसा, अण्णा हजारे, जनलोकपाल व न सुटलेले कोडे, उठ तरूणा जागा हो शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या विचारांचा धागा हो, जातीवादाला नका देऊ थारा, माणूस म्हणून जगू हाच नवा नारा, भिमा कोरेगावच्या दंगलीतील दोषींना कठोर शासन व्हावे अशा आशायाचे फलक व वेशभूषा धारण केलेली पात्रे बनवून   
मिरवणुकीत सादर करून जनजागृती करण्याचे काम खालचा माळीवाडा येथील तरुणांनी केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

या निमित्ताने विमल शेटे, सिंधुबाई जाधव, शिल्पा ताजणे, यशोदा थोरात, निर्मल भगत आदी पाच महिलांना देवीची मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. सदर यात्रा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  शैलेश बनकर, राजेंद्र गाडेकर, प्रविण ताजणे, अभिजित शेटे, महेश शेटे, जितेंद्र लोखंडे, विजय लोखंडे, नगरसेविका सुवर्णा बनकर आदींचे सहकार्य लाभले. 

Web Title: celebration of muktai devi yatra palakhi