esakal | जुन्नरला प्राचीन मंदिरात रामजन्म सोहळा

बोलून बातमी शोधा

ramjanma in junnar

जुन्नरला प्राचीन मंदिरात रामजन्म सोहळा

sakal_logo
By
दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : कोरोनामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात जुन्नर शहर व तालुक्यातील प्राचीन राममंदिरात साजरा होणारा श्री रामजन्म सोहळा गेल्या वर्षापासून घरगुती वातावरणात साजरा होत आहे. जुन्नरच्या वरली आळी येथे केशव शिवराम जोशी उर्फ-भवाळकर यांचे १३७ वर्षांचे जुने राममंदिर आहे. आत आकर्षक लाकडी कोरीव काम आहे.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

तसेच ब्राह्मण बुधवार पेठेत आदमाने याचे राममंदिर जुन्या काळातील आहे. येथे दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात रामजन्म साजरा करण्याची परंपरा आहे. कोरोनामुळे यावेळी घरच्या मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

रामनवमीच्या निमित्ताने होणारी प्रवचने कीर्तने तसेच रामनवमीला फुलांनी तसेच विद्युत मध्यान्ही होणारा रामजन्म सोहळा, पाळणा, प्रार्थना, पसायदान भक्तांनी तुडुंब भरलेला सभामंडप, सुंठवड्याचे वाटप, पेढ्यांचा प्रसाद आदी नसल्याने सारे काही यावर्षी देखील सुने सुने वाटत होते.-हरीष भवाळकर